“मराठी दलित साहित्य आणि सामाजिक न्याय चळवळ : परस्परसंबंध, प्रातिनिधिक प्रवाह आणि परिवर्तन”

Main Article Content

भूषण प्रदीपकुमार देशमुख

Abstract

मराठी दलित साहित्य हे केवळ साहित्याचे प्रवाह नसून सामाजिक वास्तव, वंचितांचे अनुभवविश्व, भेदभावाविरोधातील प्रतिकार आणि सामाजिक न्यायाच्या लढ्याचे सांस्कृतिक माध्यम आहे. सामाजिक न्याय चळवळीने दलितांच्या राजकीय, शैक्षणिक, आर्थिक आणि सांस्कृतिक उभारणीसाठी सशक्त विचार दिला; तर दलित साहित्याने त्यातील वेदना, संघर्ष, विद्रोह आणि माणूसपणाचा शोध यांना भाषिक अभिव्यक्ती दिली. या संशोधन पेपरमध्ये दलित साहित्य आणि सामाजिक न्याय चळवळ यांचा परस्परसंबंध, पिढ्यांचा विकासक्रम, कथनशैलीतील परिवर्तन, प्रतिनिधिक लेखकांचे योगदान आणि ‘साहित्य–चळवळ–परिवर्तन’ या तिन्हींच्या परस्परसंबंधाचे विश्लेषण करण्यात आले आहे.

Article Details

Issue
Section
Articles