महाराष्ट्राच्या राजकीय जडणघडणीत वसंतराव नाईक यांच्या नेतृत्वाचा आणि राजकीय स्थैर्याचा प्रभाव: एक विश्लेषणात्मक अध्ययन
Main Article Content
Abstract
१९६० मध्ये संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर राज्याला एका भक्कम आणि स्थिर राजकीय नेतृत्वाची आवश्यकता होती. यशवंतराव चव्हाण यांच्या दिल्लीतील गमनानंतर आणि मारोतराव कन्नमवार यांच्या अकाली निधनानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात निर्माण झालेली पोकळी वसंतराव नाईक यांनी भरून काढली. १९६३ ते १९७५ अशी सलग ११ वर्षे मुख्यमंत्रिपद भूषवून त्यांनी महाराष्ट्राला अभूतपूर्व राजकीय स्थैर्य दिले. प्रस्तुत संशोधन पेपरमध्ये वसंतराव नाईक यांच्या सर्वसमावेशक नेतृत्वाने, प्रादेशिक समतोलाच्या धोरणाने आणि पंचायत राजच्या सक्षमीकरणाने महाराष्ट्राच्या राजकीय जडणघडणीवर कसा दूरगामी प्रभाव टाकला, याचे विश्लेषणात्मक अध्ययन करण्यात आले आहे.
Article Details
Issue
Section
Articles