गडचिरोली जिल्ह्यातील सार्वजनिक वितरण प्रणालीचा गरीब व आदिवासी कुटुंबांच्या जिवनमानावर परिणाम-एक अभ्यास.

Main Article Content

महादेव रामभाऊ सदावर्ते, आर.बी. मेश्राम

Abstract

सार्वजनिक वितरण प्रणाली (PDS) ही भारतातील अन्नसुरक्षेची कणा मानली जाते. गरीब, वंचित आणि दुर्गम भागातील लोकसंख्येला परवडणाऱ्या दरात अन्नधान्य उपलब्ध करून देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य या यंत्रणेच्या माध्यमातून केले जाते. या पार्श्वभूमीवर प्रस्तुत संशोधनामध्ये गडचिरोली जिल्ह्यातील सार्वजनिक वितरण प्रणालीची रचना, कार्यप्रणाली, अंमलबजावणीतील अडचणी तसेच लाभार्थ्यांवर होणाऱ्या प्रत्यक्ष परिणामांचे चिकित्सक विश्लेषण करण्यात आले आहे. अध्ययनातून PDS यंत्रणेचा गरीब कुटुंबांच्या अन्नसुरक्षेसाठी सकारात्मक आणि आवश्यक असा प्रभाव स्पष्ट झाला. तरीही वितरणातील पारदर्शकता, तांत्रिक साधनांचा (e-PoS मशीन) प्रभावी वापर, लाभार्थ्यांची जागरूकता वाढविणे आणि फेरप्रक्रिया दुकानदारांच्या जबाबदाऱ्यांचे काटेकोर पालन या बाबींमध्ये सुधारणा होण्याची गरज असल्याचे आढळते. निष्कर्षतः, गडचिरोलीसारख्या आदिवासी व नैसर्गिक अडथळ्यांनी भरलेल्या जिल्ह्यात PDS ही केवळ अन्नधान्यवितरणाची प्रणाली नसून सामाजिक व आर्थिक सुरक्षेचा आधारस्तंभ आहे. यंत्रणेतील दुर्बल बाजू दूर करून तंत्रज्ञानविषयक नवकल्पना अंगीकारल्यास ही प्रणाली अधिक कार्यक्षम, पारदर्शक आणि लाभार्थ्याभिमुख होऊ शकते.

Article Details

Issue
Section
Articles