यशवंत मनोहर यांच्या ‘भारताचे क्रांतीसंविधान’ मधील न्याय संकल्पना: एक चिकित्सक अभ्यास
Main Article Content
Abstract
भारतीय संविधानामध्ये न्याय हे एक महत्त्वाचे तत्व आहेत. यशवंत मनोहर यांनी त्यांच्या वैचारिक साहित्यात भारतीय संविधानाच्या न्यायव्यवस्थेचे विश्लेषण केले आहे. ते न्यायाच्या तत्त्वावर आधारित समाजातील सामाजिक, आर्थिक आणि राजकीय सुधारणावर चर्चा करतात. त्यांच्या लेखनात न्यायाच्या या विविध बाबी भारतीय संविधानाशी जोडून एक सुसंगत दृष्टिकोन मांडला जातो. न्यायाच्या या संदर्भात यशवंत मनोहर यांनी आपले विचार मांडले आहेत आणि त्याला संविधानमूल्य म्हणून विशद केले आहेत.
भारतीय समाजातील विविध समस्यांना निरनिराळ्या परिपक्षात पाहता यशवंत मनोहर यांनी सामाजिक न्याय, आर्थिक न्याय आणि राजकीय न्याय या बाबीचा सखोल अभ्यास केला आहे. प्रत्येक व्यक्तीला समान अधिकार समान संधी आणि समान हक्क मिळवून देणारी न्यायव्यवस्था स्थापन करण्याची आवश्यकता त्यांनी आपल्या लेखनात अधोरेखित केली आहे.