नागपूर विद्यापीठाच्या स्थापनेची पार्श्वभूमी: एक ऐतिहासिक अध्ययन

Main Article Content

एस आय कोरेटी, गजानन रामाजी घुमडे

Abstract

मध्यप्रांत व वऱ्हाड प्रांतातील शैक्षणिक विकासाच्या इतिहासात नागपूर विद्यापीठाची स्थापना हा एक महत्त्वपूर्ण टप्पा आहे. हे विद्यापीठ ४ ऑगस्ट १९२३ रोजी अस्तित्वात आले. इ.स. १९१३ ते १९२३ या दशकभराच्या कालावधीत विविध समित्या, अहवाल, विधेयके आणि प्रशासकीय निर्णयांच्या माध्यमातून हे विद्यापीठ साकार झाले. सुरुवातीला कलकत्ता विद्यापीठ व नंतर इलाहाबाद विद्यापीठाच्या नियंत्रणाखाली असलेल्या या प्रांतातील उच्च शिक्षण व्यवस्थेला स्वतंत्र विद्यापीठाची आवश्यकता होती. भौगोलिक विस्तार, वाढती विद्यार्थीसंख्या, शैक्षणिक गरजा आणि विद्यापीठीय स्वायत्ततेची मागणी यामुळे ही आवश्यकता अधोरेखित झाली. इ.स. १९१४ मध्ये स्थापन झालेल्या समितीने इ.स. १९१५ मध्ये अहवाल सादर केला. या अहवालानंतर प्रथम महायुद्ध, माँटेग्यू-चेम्सफोर्ड सुधारणा यामुळे विद्यापीठाच्या संकल्पनेत बदल घडले. अखेर इ.स १९२२ मध्ये स्थानिक विधान परिषदेत विधेयक मंजूर झाले व ४ ऑगस्ट १९२३ रोजी नागपूर विद्यापीठ अस्तित्वात आले. या संशोधन पत्रात नागपूर विद्यापीठ स्थापनेची ऐतिहासिक पार्श्वभूमी, विविध टप्पे, आर्थिक व प्रशासकीय आव्हाने यांचा तपशीलवार आढावा घेण्यात आला आहे.

Article Details

Issue
Section
Articles