गडचिरोली जिल्ह्यातील सार्वजनिक वितरण प्रणाली अंतर्गत स्वस्त धान्य दुकानांचे कार्य आणि संघटन
Main Article Content
Abstract
सार्वजनिक वितरण प्रणाली (Public Distribution System – PDS) ही भारतातील अन्नसुरक्षा सुनिश्चित करणारी एक महत्त्वपूर्ण लोककल्याणकारी योजना असून, आर्थिकदृष्ट्या दुर्बल व वंचित घटकांना अनुदानित दरात जीवनावश्यक अन्नधान्य उपलब्ध करून देण्याचे कार्य करते. या व्यवस्थेमध्ये स्वस्त धान्य दुकाने ही शासन आणि लाभार्थी यांच्यामधील अंतिम व अत्यंत महत्त्वाची कडी आहे. गडचिरोली जिल्ह्यातील अनेक कुटुंबांना अन्नधान्यासाठी सार्वजनिक वितरण प्रणालीवर अवलंबून राहावे लागते. त्यामुळे या जिल्ह्यात कार्यरत स्वस्त धान्य दुकानांचे कार्य, संघटनात्मक रचना आणि वितरण व्यवस्थेची परिणामकारकता यांचा अभ्यास करणे आवश्यक ठरते.
प्रस्तुत संशोधन पेपरमध्ये गडचिरोली जिल्ह्यातील सार्वजनिक वितरण प्रणाली अंतर्गत कार्यरत स्वस्त धान्य दुकानांची संघटनात्मक रचना, कार्यपद्धती, अन्नधान्य वितरणाची प्रक्रिया, पारदर्शकता, नियमितता आणि कार्यक्षमतेचे मूल्यांकन करणे हा आहे.