बहुधुवीय विष्वव्यवस्थेमध्ये भारताचे परराश्ट्रीय धोरणाची भूमिका

Main Article Content

विनोद किसन क्षिरसागर, संजय एम. अवधूत

Abstract

आंतरराष्ट्रीय संबंध हे वैश्विक स्तरावर समग्र राष्ट्रासाठी राष्ट्रीय गतीविषयक व्यवहारिक संबंध आहे. आंतरराष्ट्रीय संबंधाचा विचार करता भारत हे आपल्या राष्ट्राचे हित साध्य करण्यासाठी आणि वैश्विक स्तरावर महत्व प्राप्त करण्यासाठी परराष्ट्रीय धोरण आखत असतो. भारत आपले हित साध्य करीत असतांना परराष्ट्रीय धोरणांतर्गत शीत युद्धकालीन द्विध्रुवीय वैश्विक काळात नव्याने स्वातंत्र्य झालेल्या राष्ट्रांबरोबर मिळून स्वतंत्र अशी गुटनिरपेक्ष व्यवस्था ठरविली होती. शीत युद्धाच्या नंतर विश्वव्यवस्थेमध्ये अमेरिका हा केंद्रीय सत्तेच्या ठिकाणी एकमेव सत्ता उरली जो 20 व्या शतकाच्या अंतिम दशकामध्ये एकध्रुवीय व्यवस्थेचे नेतृत्व कर्ता व्यक्ती म्हणून उदयाला आला. पण येणाऱ्या पाच ते सात वर्षामध्ये एकध्रुवीय विश्वव्यवस्थेला आव्हान देणारे नव – नवीन राष्ट्रे समोर आल्याचे जाणवते. 21 व्या शतकामध्ये एक ध्रुवीयकरणाला टक्कर देत वेगवेगळ्या क्षेत्रात विविध राष्ट्रे शक्ती प्राप्त करून व तंत्रज्ञानिय मक्तेदारी तसेच वैश्विक बाजारपेठेचा आकार, भौगोलिक महत्व यामुळे स्वतःच्या राष्ट्राला समर्थता प्राप्त करून दिलेत. या राष्ट्रांमध्ये सोवियत संघ रशियाचे उत्तराधिकारी रशिया हा अमेरिकेला पुन्हा प्रतिकार करणारी सक्षमता प्राप्त केली तर जर्मन, चीन यांनी स्वतःच्या राष्ट्राचा तंत्रज्ञानिय व आर्थिक विकास करत शक्ती संतुलन मध्ये प्रवेश केलेले आहे. याचबरोबर बदलत्या विश्वामध्ये विकसित राष्ट्रे आणि विकसनशील राष्ट्रांना देखील महत्व प्राप्त होत राहिले ज्यामध्ये संयुक्त राष्ट्र संघटनेच्या सुरक्षा समितीचे स्थायी सदस्य ब्रिटन आणि फ्रान्स हे राष्ट्र तर 20 व्या शतकापासून आर्थिक व तंत्रज्ञानिय दृष्ट्या समृद्ध आहेत. 21 व्या शतकामध्ये भारत, जपान, ऑस्ट्रेलिया, ब्राझील, दक्षिण आफ्रिका, कॅनडा, इटली आणि दक्षिण कोरिया या राष्ट्रांनी देखील आपल्या राष्ट्राचे भौगोलिक महत्वानुसार वैज्ञानिक, आर्थिक व बाजारपेठीय विकास घडवून एकध्रुवीय विश्वव्यवस्थेसमोर एक आव्हान म्हणून उभे झाले. ही राष्ट्रे सत्ता संघर्ष आणि शक्ती संतुलनामध्ये आपापल्या राष्ट्रांना महत्व प्राप्त करून आपले राष्ट्रीय हित समोर ठेवून वैश्विक व्यवस्था निर्माण करायला भाग ठरतात. ज्यांचे मूल्यांकन करणे महत्वाचे वाटते.


भारताची गरज ही बहुध्रुवीय विश्वामध्ये आर्थिक संरक्षण, राष्ट्रीय संरक्षण, व्यापारिक व्यवहार, अमेरिका व रशिया यासारख्या एका दुसऱ्या प्रती विरोधात्मक विचारधारा शक्ती प्राप्त राष्ट्रांबरोबर कशा पद्धतीने भारताचे राजकीय संबंध आहेत यावर लक्ष केंद्रित करणे महत्वाचे वाटते? बहुध्रुवीय विश्वव्यवस्थेमध्ये भारत राष्ट्रीय संरक्षणात्मक वस्तू जसे की शस्त्रे हे पारंपारिक राष्ट्र रशियाबरोबरच अमेरिका, फ्रान्स सोबतच जर्मन व इटलीबरोबर संरक्षण क्षेत्रामध्ये व्यवहार करतांनी दिसून येते. ज्यांचे मूल्यांकन अत्यंत महत्वाचे ठरते? बहुध्रुवीकरण विश्व व्यवस्थेमध्ये भारत आपल्या राष्ट्राचे परराष्ट्रीय धोरण आखत असताना इतर राष्ट्रांबरोबर होत असलेल्या व्यवहारातून कुठल्याही दबाव तंत्राचा प्रभाव भारताच्या सार्वभौमत्वावर पडतो की नाही याचे देखील मूल्यांकन करण्याचा महत्वाचे उद्देश आहे.

Article Details

Issue
Section
Articles